100 ‘कोल्हे’ एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाहीत : CM देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठिकठिकाणी जोरदार राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा होताहेत. त्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, 100 कोल्हे एकत्र आले तरी सिहांची शिकार करू शकत नाहीत.

सरकारने केलेल्या कामाचा कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, तसेच राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-शिवसेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने 5 वर्षांत राबविल्या. 5 वर्षांत 50 हजार कोटींची विकासकामे केलीत.

त्याचप्रमाणे आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उतरवा, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, माझ्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला. अशा पळपुटांना आमच्याविरोधात का उभं करता ? असा सवाल करत 100 कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करु शकणार नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

युती सरकारने आपल्या काळात अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगिलते. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही पहिलीच सभा होती. आम्ही संपूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरलो आहोत त्यामुळे पाच वर्षाच्या मुलाला देखील माहिती आहे की निकाल काय लागणार आहे असे परखड मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like