सत्तेचा ‘माज’ उतरल्यानंतर ‘साम-दाम-दंड’ चालत नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने सरकार बनवण्यास असमर्थ असल्याच जाहीर करावं, मग आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करु. साम-दाम-दंड भेद जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत चालतो. हा सत्तेचा माज उतरल्यानंतर तो चालत नाही. भाजप मुख्यमंत्री शिवसैनिक असल्याचं सांगत असल्यास मग अमित शहा आणि मोदींनी आमच्या पक्षात प्रवेश करावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.

स्वत:ही सरकार स्थापन करायचं नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे, हे आता चालणार नाही. राज्यघटना ही तुमची जहागीर नाही. ‘कायदे के दायरे मे रहकर’ शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. सरकार बनवण्यास असमर्थ आहोत, हे त्यांनी जाहीर करावं. मग शिवसेना पावलं उचलेल. महाराष्ट्राला लवकर एक चांगले सरकार मिळेल. शिवसेना कधी आशेवर जगत नाही, आत्मविश्वासावर जगते. आमच्या आमदारांच्या निष्ठा आणि लोकांचा असलेला पाठिंबा यावर प्रवास करत राहू. मतदारांना शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. आमचा मुख्यमंत्री कसा बनेल ते सभागृहात कळेल. संख्याबळ झालं आहे, ते सभागृहात दाखवू. आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही, असे राऊत म्हणाले.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सगळ्या आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल. महाराष्ट्रात जी अस्थिरता निर्माण होताना दिसतेय, ती अस्थितरता त्यांच्यामुळे निर्माण होतेय. राज्यातील सगळ्या पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका घेतली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like