राष्ट्रवादीला मोठा धक्का ! तिकीट दिलेल्या ‘या’ उमेदवाराची माघार, पुन्हा सेनेत प्रवेश करणार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न युतीकडून सुरु आहे. यामध्ये काही ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यात यश आले आहे. पालघरमधून अमित घोडा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले होते. मात्र, त्यांनी माघार घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहित पाहून हा निर्णय घेतला असल्याने आपण आपला निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे सुहास देसाई यांनी स्पष्ट केले. ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीने काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने या ठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपचे संजय केळकर यांच्या मुख्य लढत होणार आहे. राष्ट्रवादीने या ठिकाणी मनसेला पाठिंबा दिला आहे.

कोथरुड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

Visit : Policenama.com