‘हे’ कारण देत अबू आझमींनी केलं शिवसेनेचं ‘स्वागत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल अशी शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्यास अनुमती दर्शवली आहे. परंतू आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करुनच निर्णय घेऊ असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यातीलच एक मित्र पक्ष आहे समाजवादी पक्ष. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत असलेला हा पक्ष भाजप शिवसेनेचा कट्टर विरोधक मानला जातो. कारण या दोन्ही पक्षांचा अजेंडा हा हिंदुत्ववाद राहिला आहे आणि सपाचा याला विरोध आहे. परंतू आघाडीतीलच मित्र पक्ष शिवसेनेला पाठिंबा देण्यास पुढे सरसावत असताना त्यांनी या प्रयोगाचे समर्थन केले आहे शिवाय त्यामागेच कारण देखील स्पष्ट केले आहे.

भाजपला कुमकुवत करण्याच्या दृष्टीने योग्य –
भाजप शिवसेना युतीत लढल्या, युतीला जनतेचा कौल देखील मिळाला. परंतू त्यांना सरकार बनवता आले नाही, अशावेळी भाजपला कुमकुवत करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल असे मत सपा नेते अबू आझमी यांनी मांडले.

ते पुढे म्हणाले की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून देश विनाशाकडे चालला आहे. हिंदू, मुस्लीम, मंदिर-मशीद, गाय-बैल यात अडकला आहे. संधी मिळाली तर भाजप पुन्हा शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करु शकतात. त्यापेक्षा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे कधीही योग्यच. मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भिवंडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसच राष्ट्रवादीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांनी शिवसेनेला समरस व्हालं लागेल असेही स्पष्ट केले. या दरम्यान त्यांचा रोख हिंदुत्वाच्या मुद्याकडे आहे. मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित काही विषय भाजप सेनेच्या युतीच्या सरकारने मार्गी लावले नव्हते, त्यावर योग्य तो निर्णय व्हावा अशीही अपेक्षा अबु आझमी यांनी बोलून दाखवली.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतला आहे. अबु आझमी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दर्शवली. यावर बोलताना अबू आझमी यांनी इच्छा व्यक्त केली की उद्धव ठाकरे कमी आक्रमक आहेत. मुस्लिम आरक्षणाला त्यांचा प्रखर विरोध नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे.

हा आहे फॉर्म्युला –
महाविकासआघाडीने आपला फॉर्म्युला तयार केला आहे त्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत शिवसेनेसोबत बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सरकार स्थापनेची अधिकृत घोषणा या तिन्ही पक्षांकडून करण्यात येईल. शरद पवार मुंबईमध्ये परतताच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी पवारांच्या निवासस्थानी चर्चा केली. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटपात शिवसेना राष्ट्रवादीला 15, 15 तर काँग्रेसला 13 असे मंत्रिपदांचे वाटप करण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयार करण्यात आलेला फॉर्म्युला आता शिवसेनेसमोर ठेवण्यात येईल. त्यानुसार सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटपात शिवसेना राष्ट्रवादीला 15, 15 तर काँग्रेसला 13 असे मंत्रिपदांचे वाटप करण्यात येईल. शिवसेनेला यात मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे वाट्याला येतात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदासाठी अनुक्रमे 15 आणि 13 मंत्रिपदे येतील.

दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे 14 मंत्री असा फॉर्म्युला आहे.

तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदांची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्वाची खाती मिळावीत असा आघाडीचा आग्रह असेल. त्यानुसार राष्ट्रवादीला गृह मंत्री आणि अर्थमंत्री पद, शिवाय महसूल आणि ग्रामीण विकास खाती आपल्याला मिळवीत असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगर विकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यामुळे समान मंत्रिपदे की काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मागणीनुसार महत्वाची खाती त्यांनी द्यायची हा निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.

Visit : Policenama.com