बाळासाहेब थोरातांचा ‘त्या’ वक्तव्यावरून नितीन गडकरींना ‘टोला’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेतील सत्ता स्थापनेच्या नाट्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेटचे उदाहरण देत सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले होते. मात्र क्रिकेट आणि राजकारण यात फरक आहे, क्रिकेटमध्ये बॉल दिसतो परंतु भाजपला बॉल दिसला नसल्याचा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

आम्ही राज्यपालांना भेटून राज्यात शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी विनंती केली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप उशिरा राज्यपालांना भेटले आहेत. राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल असा विश्वास देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तसेच आशिष शेलार यांनी राज्यात तीन अंकी नाट्याचा प्रयोग सुरु आहे अशी टीका महाशिवआघाडीवर केली होती. त्यावर तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून बोलत आहे असा टोला बाळासाहेब थोरातांनी शेलारांना लगावला आहे.

काय म्हणाले होते नितीन गडकरी
क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं होतं. मात्र सरकार नेमकं कोणाचं येईल हे माहित नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.

आमदारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सहकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सांगितले होते तसेच चिंता करू नका, वेळ लागेल परंतु सरकार आपलेच येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला होता.

Visit : Policenama.com