‘या’ कारणामुळे NCP चे नेते पवार हे 280 हुन अधिक आमदारांसमोर जितेंद्र आव्हाडांवर ‘भडकले’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात एकही सदस्य सभागृत उपस्थित उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला जयंत पाटील, नवाब मलिक, सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिले. परंतु विश्वासदर्शक ठराव मांडत असताना अजित पवार हे जितेंद्र आव्हाडांवर संतापले आणि तोच चर्चेचा विषय ठरला.

विश्वासदर्शक ठरावावेळी प्रत्येक आमदाराच्या आसनाला ठरावीक अनुक्रमांक देण्यात येतो. त्याप्रमाणे विधानसभेतल्या प्रत्येक सदस्यांना विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचे असते. विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठी जागेवर उभ राहून आपलं नाव सांगत अनुक्रमांकाचा उल्लेख करावा लागतो. मात्र, नाव आणि अनुक्रमांकाचा उल्लेख करताना बऱ्याचदा आमदरांची गफलत होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील अशाच प्रकारे गोंधळून गेले.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ती गणती वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत आली. त्यांनी अनुक्रमांक 14 सांगत स्वत:च नाव सांगितले. त्यानंतर के.सी. पाडवींनी 15 अनुक्रमांक सांगत नाव सांगितले. यांनंतर नंबर आला जितेंद्र आव्हाड यांचा. अनुक्रमांक सांगताना आव्हाडांची गल्लत झाली. आव्हाडांनी आपले नाव सांगत अनुक्रमांक 16 सांगण्याऐवजी 20 सांगितला. त्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. हा प्रकार अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच आव्हाडांना तुमचा क्रमांक 20 नसून 16 असल्याचे सांगत आव्हाडांना रागाच्या भरातच सर्वांसमक्ष सुनावले.

आव्हाड आपला क्रमाक चुकल्याचे त्यांच्या शेजारी बसलेले हसन मुश्रीफांच्या देखील लक्षात आले. त्यांनी देखील त्यांची चूक लक्षात आणून दिली. असाच प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला. बालाजी कल्याणकर यांना 100 अनुक्रमांक दिला असताना त्यांनी 78 असा उच्चारला. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावात पास झाले मात्र गणितात नापास झाले असे म्हणण्याची वेळ आली.

Visit : Policenama.com