महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर होतील निवडणुका ! बजेट सत्रात सादर होऊ शकते विधेयक

मुंबई : महाराष्ट्र सरकार निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपर पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. असे मानले जात आहे की, मार्चमध्ये राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात यासंबंधीचे विधेयक मांडले जाऊ शकते. न्यूज 18 शी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला ईव्हीएमसह बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पटोले म्हणाले, जर ड्राफ्ट तयार असेल तर विधेयक पुढील बजेट सत्रात सादर केले जाऊ शकते.

मात्र, सादर केलेले बिल केवळ राज्य विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी लागू होईल. जर ठाकरे सरकारने या विचारावर पुढी कार्यवाही पार पाडली तर महाराष्ट्रात बॅलेट पेपर आणि ईव्हीएमवर एकाच वेळी निवडणुकीसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारे पहिले राज्य असेल.

पटोले म्हणाले – लोकशाहीवर विश्वास ठेवणारे होतील खुश
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष – शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसचे यावर एकमत असल्याचे मानले जात आहे. अशाप्रकारच्या पावलाच्या कायदेशीर प्रभावाबाबत विचारले असता, पटोले म्हणाले, राज्यात निवडणुकी करता हा कायदा बनवण्यासाठी संविधानाच्या कलम 328 च्या अंतर्गत विधानसभेकडे अधिकार आहेत. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसह याच्याशी संबंधित अनेक लोकांसोबत बैठक झाली आहे.

पटोले यांनी म्हटले, कलम 328 राज्य सरकारला अशाप्रकारचा कायदा करण्याचा अधिकार देते. त्यांनी म्हटले की, निवडणूक ईव्हीएमद्वारे होणार की, बॅलेट पेपरद्वारे हा निर्णय राज्य करेल. त्यांनी म्हटले, जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात, बॅलेट पेपरवर विश्वास ठेवतात, ते यामुळे खुश होतील.

या संदर्भात एनसीपी नेते माजिद मेमन यांनी म्हटले की, ईव्हीएमने निवडणुका करण्याबाबत निष्पक्षतेसंबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मेमन म्हणाले, जे लोक मत टाकत आहेत, त्यांचा विश्वास महत्वाचा आहे.