नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ‘महाराष्ट्र केसरी’ 2020

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरने जिंकली आहे. नाशिकचा पठ्या हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हा अंतिम सामना हर्षवर्धन सदगीर आणि शैलश शेळके या दोन पैलवानात रंगला होता. यात हर्षवर्धन सदगीरचा 3 – 2 गुणाने विजय झाला आहे.

शरद पवार यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन हर्षवर्धन सदगीरला गौरवण्यात आले. यावेळी शैलश शेळकेने विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर याला खांद्यावर उचलून घेतले. येथे शैलेशच्या खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.

महाराष्ट्र केसरीचा हा सामना पुण्यात बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात सुरु होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरीचा बहुमानाचा सन्मान हर्षवर्धन सदगीर याला दिला.

हर्षवर्धन हा या स्पर्धेत नाशिककडून खेळतो पण अर्जुनवीर काका पवारांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/