Maharashtra Monsoon Update | वातावरणाच्या बदलामुळे मोसमी पाऊस लांबणीवर?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच मोसमी पावसाचं (Maharashtra Rains) आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तविला गेला होता. मात्र मागील काही दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. वातावरणाच्या बिघाडामुळे पाऊस कर्नाटक (Karnataka) आणि गोव्याच्या (Goa) सीमेलगत रेंगाळत आहे. दरम्यान आगामी तीन दिवसामध्ये दक्षिण कोकणात (South Konkan) मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Monsoon Update) जोरदार बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

मोसमी पावसानं मागील 8 दिवसांपासून कोणतीही प्रगती केली नाहीये. गोव्याच्या सीमेपासून काही अंतरावरच तो रेंगाळला आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही त्याची प्रगती मागील 5 दिवसांपासून थांबली आहे. सध्या संपूर्ण केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka), तमिळनाडूचा (Tamilnadu) काही भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सून दाखल झालाय. या भागामध्ये काही प्रमाणात पाऊस होताना दिसत आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

काल काही जिल्ह्यात पाऊसाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही ठिकाणी पावसाने वेग घेतला होता. सातारा (Satara) शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. तासभर झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. अचानक आलेल्या या पावसाने शहराला झोडपून काढलं आहे. तर, जळगाव, रत्नागिरी या ठिकाणीही पाऊस बरसला आहे.

दरम्यान, असं असलं तरी विदर्भात (Vidarbha) वातावरण वेगळं आहे. विदर्भात मात्र उकाडा आहे.
चंद्रपुरातल्या ब्रम्हपुरी मध्ये विदर्भातील सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं आहे.
तसेच, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही 45 अंशांवर तापमान गेलं आहे. नागपूरमध्ये 44.4 अंश तापमान आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon entry soon in south kokan maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा