‘घर’ सोडावं लागलं त्यांना ‘गृहनिर्माण’ तर ज्यांना ‘रोजगार’ नव्हता त्यांना ‘रोजगार हमी’ची जबाबदारी : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कठोर शब्दात राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ज्यांना घर सोडावं लागलं त्यांनाच गृहनिर्माण मंत्री केले, ज्यांना रोजगार नव्हता त्यांना रोजगार हमीची जबाबदारी दिली असे म्हणत धनंजय मुंडे यांनी चांगलेच शरसंधान साधले.

भारतीय जनता पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वत:ला शक्तीशाली पक्ष सांगतात तरीही त्यांना दुसऱ्या पक्षातील लोकांची गरज पडते. याचाच अर्थ भाजप नेतृत्वाला आपला पक्ष कमकुवत असल्याचे भासते असे म्हणत धनंजय मुंडे यांनी थेट भाजप नेत्यांनाच लक्ष केले.

त्यांचा राजकीय स्वार्थ पुर्ण होत नव्हता –

बीडच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात जरी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता असलो तर बीड जिल्हात सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर हे दोघे माझे नेते होते. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत नसल्याने त्यांचा राजकीय स्वार्थ पुर्ण होत नव्हता, त्यामुळे पक्ष सोडून जाताना कोणाला तरी दोष द्यावा लागेल म्हणून माझे नाव घेण्यात आले.

मी दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार –

इनाम जमिनीच्या कथित बेकायदा खरेदी प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. या प्रकरणी माझ्यावर करण्यात येणाऱ्या कोणत्याही आरोपात कसलेही तथ्य नाही. राज्यातील एका विरोधी पक्ष नेत्याला त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहे. आता दुसऱ्या विरोधी पक्षावर खोटे आरोप लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी याआधी देखील सांगितले आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली माझ्यावर आरोप लावण्यात येणाऱ्या प्रकरणांची चौकशी करावी, मी दोषी आढळलो तर सरकार ठरवेल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.

सिनेजगत  

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

 शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

 मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

 दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक