छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Police News | सामाजिक आणि कायद्याचे सर्वाधिक भान लोकप्रतिनिधींना बाळगणे आवश्यक असते. पण, अनेकदा मस्तवाल झालेले लोकप्रतिनिधी कायदे पायदळी तुडवतात. असाच काहीसा प्रकार संभाजीनगरमध्ये घडला आहे. येथे एका भाजपा माजी नगरसेकाने बाईक रॅली विरूद्ध दिशेने नेण्यासाठी हुज्जत घातल्याने पीएसआयने कारवाई केली. मात्र, चोख कर्तव्य बजावणाऱ्या या अधिकाऱ्याची तातडीने कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. (PSI Transfer To Control Room)
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्य बजावल्याची शिक्षा देण्यात आली का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.(Maharashtra Police News)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी भाजपा माजी नगरसेवक अनिल मकरिये हे मोटार सायकल रॅली विरुद्ध दिशेने जाऊ द्या अशी मागणी करत होते. पोलिसांनी अडवल्याने ते पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले.
या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची पीएसआय सचिन मिरधे यांची बदली कंट्रोल रूमला केली आहे. या कारवाईनंतर कर्तव्य बजावल्याची शिक्षा वरिष्ठांनी दिली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार