Maharashtra Police News |  डीवायएसपीची ‘लॉ’ परीक्षा कॉन्स्टेबलने दिली, विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | 2019 मध्ये घेण्यात आलेल्या विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेस (Law Exam) जालन्याचे तत्कालीन डीवायएसपी सुधीर खिरडकर (DySP Sudhir Khiradkar) यांनी डमी विद्यार्थी (Dummy Candidates) बसवून परीक्षा दिली होती. याप्रकरणी खिरडकर व विद्यार्थी म्हणून बसलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक (Police Constable Somnath Mandlik) यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करावेत, असे पत्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कदीम जालना पोलिसांना (Jalna Police) दिले आहे. (Maharashtra Police News)

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये विधि अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली होती. जालना येथील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात (Savitribai Phule in Women’s College of Arts, Commerce and Science) या परीक्षेचे केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर विधि अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी जालन्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर (Sudhir Khiradkar) यांनी त्यांच्या जागी डमी विद्यार्थी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ शहादेव मंडलिक यांना बसवून पेपर दिल्याची तक्रार प्राप्त झाली होती. (Maharashtra Police News)

या प्रकरणी कुलगुरू (Vice-Chancellor) यांच्या आदेशाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे (Management Council Member Dr. Vilas Khandare) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने चौकशी करुन डीवायएसपी सुधीर खिरडकर व डमी विद्यार्थी सोमनाथ मंडलिक यांना दोषी ठरविले आहे. समितीने सादर केलेला अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या 9 मे 2022 रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक (Director of Examinations and Assessment Board) डॉ. गणेश मंझा (Dr. Ganesh Manjha) यांनी कदीम पोलिसांना खिरडकर व पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्र 4 जून रोजी पाठविले आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली. (Jalna Crime)

 

लाचेच्या प्रकरणात अडकले होते खिरडकर
सुधीर खिरडकर हे उपविभागीय पोलीस अधीकारी म्हणून काम करत असताना वादग्रस्त ठरले होते.
एका अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात (Atrocity Case) आरोपीचे नाव वगळण्यासाठी त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने लाच (Bribe) घेतली होती.
ही लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) त्यांना अटक (Arrest) केली होती.
त्यानंतर त्यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली. आता थेट तत्कालीन डिवायएसपी यांनीच ‘लॉ’ ची परीक्षा डमी विद्यार्थ्याला बसवून दिल्याचे समोर आल्याने या ‘मुन्नाभाई’ ची जालन्यात चर्चा रंगली आहे.

 

Web Title :-  Maharashtra Police News | dysp Sudhir Khiradkar goes to munnabhai to get dummy candidates in law exam

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा