Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांच्या PSO, पोलिस कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी गुजरातमधील सूरत येथे गेले. त्यानंतर तेथून हे सर्व आमदार गुवाहाटी येथे गेले. आमदार राज्याबाहेर जात असताना याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत (Maharashtra Political Crisis) बंड केलेल्या 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर (Personal Security Officer), कमांडो (Commando) आणि कॉन्स्टेबल (Constable) यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली होती.

 

राज्य सरकार (State Government) या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला (Intelligence Department) माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे (Action) आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.

बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यापासून?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील सहा महिन्यापासून सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे
यांच्या भाजप (BJP) नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती,
अशीही माहिती मिळत आहे. इंटेलिजन्सचा रिपोट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने
ही परिस्थिती निर्माण झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिली.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde action taken against shiv sena mla pso commando and police constable maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’

 

Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

 

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी