Maharashtra Politics News | अजित पवारांच्या निर्णयावर महाविकास आघाडीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दुपारपर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी अचानक शिंदे-फडणवीस सरकारसोबत (Shinde-Fadnavis Government) जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. (Maharashtra Politics News) दरम्यान, यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

 

अंबादास दानवे यांनी ट्विट करुन म्हटले की, जे निधी देत नाहीत म्हणून ओरड होत होती, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार! आता कोणाला दोष देणार? मला कीव येते त्या 40 जणांच्या गँगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..! उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस (Congress) पक्ष हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी!… तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची भीती मिंधे गटापेक्षा भाजपलाच (BJP) अधिक वाटते आहे. निकालाचा उलटफेर झाला तर सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे. (Maharashtra Politics News)

 

 

अजित पवारांची घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह
शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे नेते व मंत्री यांच्या उपस्थित अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ (DyCM Oath) घेतली आहे.
आज अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal),
दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde),
धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram), आदिती तटकरे (Aditi Tatkare), संजय बनसोडे (Sanjay Bansode),
अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Maharashtra Politics News)

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | maharashtra political crisis mahavikas aghadi first reaction to ajit pawar decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा