Maharashtra Political Crisis | ‘दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट पर्मनंट हुजरेच राहतील’, मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार; म्हणाले-‘अंगूर खट्टे है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी (NCP Rebellion) करत शिंदे-फडणवीस सरकरमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेप्रमाणेच (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. (Maharashtra Political Crisis) दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी खरपूस शब्दात समाचार घेत पलटवार केला आहे.

 

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा शपथ विधी झाला. मंत्रिपदाची शपथ घेऊन 11 दिवस झाले मात्र, त्यांना खातेवाटप झाले नाही. खातेवाटपावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. दरम्यान, खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांच्यात बैठका झाल्या. मात्र, यात तोडगा निघाला नसल्याने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. (Maharashtra Political Crisis)

 

 

जो माणूस इथे राजासारखा राहत होता, तो माणूस दिल्लीत सुभेदार बनायला चालला आहे,
अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली होती.
आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी
यांनी पलटवार केला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत आव्हाडांना प्रत्युत्तर दिले आहे.
दादा कालही राजे होते, आजही आहेत आणि उद्याही राजेच राहणार… दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते, आजही आहेत, आणि पर्मनंट हुजरेच राहतील… #अंगुरखट्टेहै, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

 

Web Title : Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari replied jitendra awhad over statement on dcm ajit pawar delhi tour

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा