Maharashtra Political Crisis | ’पंकजाताईला मुख्यमंत्री करा…’; कार्यकर्त्यांच्या घोषणा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | ‘पंकजा ताई भावी मुख्यमंत्री, पंकजा ताईंना मुख्यमंत्री करा,’ अशा घोषणा एका मुंडे समर्थकाने बीडमधील आष्टी येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात दिल्या. मात्र कार्यकर्त्याचा हा अतिउत्साह पाहून आणि घोषणा ऐकून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही खळखळून हसू आले. यावर मिश्किल टिप्पणी करताना त्या म्हणाल्या, ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते.’ (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय भूकंप झाला आहे. सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले असून सत्तास्थापनेसाठी भाजपा (BJP) कधीही दावा करू शकते, किंवा राष्ट्रपती राजवट (Presidential Reign) लागू होऊ शकते, अशी स्थिती आहे. या सर्व घाडमोडींवर राजकारणासह सर्वच स्तरातून बारीक लक्ष ठेवले जात आहे. राजकीय कार्यकर्तेसुद्धा उत्कंठेने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने आज थेट त्यांच्या उपस्थितीतच पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशी घोषणाबाजी केल्याने पंकजा मुंडे यांचीही गोची झाली आणि त्यांनी यावर मिश्किल टिपण्णी केली. पंकजा पुढे म्हणाल्या की, “माझा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा आमचा एक उत्साही कार्यकर्ता उठून घोषणा देऊ लागला. पण ती घोषणा दिल्याबरोबर बाकी सगळे एकत्र म्हणाले, गप रे…मी म्हटले आत्ता यांना माझी खरी काळजी वाटायला लागली आहे. त्यांच्या लक्षात आले आहे की, आपले ताईंवर जे प्रेम आहे, त्याचे कधीकधी आपण अघोरी प्रदर्शन करतो.”

यावेळी पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी काल दिवसभर टिव्हीही पाहिला नाही.
त्या प्रकरणाबाबत तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मलाही आहे. त्यामुळे या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.”

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | pankaja munde bjp worker shouted make pankaja munde cm of maharashtra political crisis beed news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

 

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’