Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Maharashtra Political Crisis | shivsena 16 mlas fait to be decided by vidhan sabha speaker says supreme court 
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. नबाम राबिया प्रकरण (Nabam Rabia Case) या खटल्यात लागू होत नाही, असं नमूद करत या खटल्याची सुनावणी आता 7 जणांच्या खंडपीठाकडे देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षाला हटवण्याची नोटीस दिल्याने अपात्रतेच्या नोटिस जारी करण्याचा अधिकारांवर मर्यादा येईल की नाही यासारख्या मुद्यांवर मोठ्या खंडपीठाने (Bench) तपासणी करणे आवश्यक आहे. असे मत कोर्टाने नोंदवले आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे पुर्वीची स्थिती कोर्ट आणू शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मागील 11 महिन्यांपासून सुरु असलेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group)
वादावर अखेरीस सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) निकालाचे वाचन सुरु झाले आहे.
16 मे रोजी सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी पूर्ण झाली होती.
त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या घटनापीठाने
आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणावर वाचन सुरु झाले आहे.
कोर्टाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा दिला आहे.
विधानसभा अध्यक्षाला हटवण्याची नोटीस दिल्याने अपात्रतेच्या नोटिस जारी करण्याच्या अधिकारांवर मर्यादा
येईल की नाही यासारख्या मुद्यांवर मोठ्या खंडपीठाने तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.

Web Title :-  Maharashtra Political Crisis | shivsena 16 mlas fait to be decided by vidhan sabha speaker says supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis | अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘तोपर्यंत सरकारला धोका…’

Total
0
Shares
Related Posts