Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर; खासदार अनिल देसाईंनी दिली माहिती

0
1007
Maharashtra Political Crisis | uddhav thackeray group submits written argument to election commission on shivnsena dispute
file photo

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात येत आहे. याप्रकरणाची सुनावणी निवडणुक आयोगासमोर (ECI) सुरू असून आज याप्रकरणी लेखी युक्तीवाद आयोगाकडे सादर करण्याची सुचना निवडणुक आयोगाकडून दोन्ही गटांना देण्यात आली होती. त्यालाच अनुसरून आज (दि.३०) शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर केला आहे. अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली. निवडणुक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून युक्तीवाद सादर केल्याची माहिती अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. (Maharashtra Political Crisis)

 

यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले, ‘२१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात स्पष्ट केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं आहे.’ अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी यावेळी बोलताना दिली. (Maharashtra Political Crisis)

 

तसेच यावर पुढे बोलताना अनिल देसाई म्हणाले, ‘आमदार खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या आहेत.’ असं यावेळी बोलताना खासदार अनिल देसाई म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | uddhav thackeray group submits written argument to election commission on shivnsena dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amyra Dastur | अभिनेत्री अमायरा दस्तूरच्या ‘या’ लूकने चाहत्यांना लावले वेड

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…