Maharashtra Political News | अजित पवारांच्या गटाला सोबत घेतल्याने अनेक भाजप आमदार नाराज, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा दावा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गट राष्ट्रवादीमधून (NCP) फुटून शिंदे-भाजप सरकारमध्ये (Shinde-BJP Government) सामील झाला. अजित पवार आणि त्याच्या 8 समर्थक आमदारांनी शपथ घेतील. मात्र या मंत्र्यांचा शपथविधी पार पडून दीड आठवडा झाला तरी अद्याप त्यांना खातेवाटप झाले नाही. खातेवाटपावरुन सध्या या तीन तिघाडा सरकारमध्ये बराच गोंधळ आहे. अजित पवार गटाला सोबत घेतल्याने भाजप मिंधे गटाचे आमदार नाराज असल्याचे समोर येत आहे. (Maharashtra Political News) यातच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी राष्ट्रावदीला सोबत घेतल्याने अनेक भाजप आमदार (BJP MLA) नाराज असल्याचा मोठा दावा केला आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

भाजप सत्तेसाठी हपापलेले

भाजप सत्तेसाठी हपापलेले दिसतेय. राज्यात फोडाफोडीचे राजकारण (Maharashtra Political News) चालले आहे. राज्यातील राजकारणाची सद्य:स्थिती घाणेरडी आणि किळसवाणा प्रकार आहे. महाराष्ट्रानं असं राजकारण पाहिलेलं नाही. सध्याच्या या घाणेरड्या राजकारणाची महाराष्ट्राला किळस आली आहे. आमदार या पक्षातून त्या पक्षात जाण्याच्या अफवा भाजप पसरवीत असल्याचा गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघात केला.

 

अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक

एकनाथ खडसे म्हणाले, शिवसेना शिंदे गटाचे आमदार (Shiv Sena Shinde Group MLA) गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्री होण्यासाठी उभे आहेत. अनेक आमदार स्वत: सागत आहेत की मी मंत्री होणार आहे, असा मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे. तर काही जण म्हणत आहेत, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, माझा शपथविधी ठरवला आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे, मंत्रिमंडळात जाण्यास इच्छुक आहे. मात्र, ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटप होईल, त्यावेळी या गोष्टींतून नाराजीची मोठी उकळी होईल, असा दावा खडसे यांनी केला.

 

भाजपमधील आमदारांमध्ये नाराजी

भाजपमधील आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी, अस्वस्थता ते बाहेर बोलत नाहीत.
मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचे अनेक
आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. त्यासंदर्भात ते माझ्याशी चर्चा करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोबत घेतलेल्या निर्णयाचा संबंध नागपूरशी असल्याचे सांगतात,
असेही त्यांच्याकडून चर्चेत ते सांगतात, असा दावा खडसे यांनी केला. एकंदरीत याचा परिणाम निश्चित आगामी काळात दिसेल.
तो शिंदे गट व अजित पवार गटासाठी अनुकूल असेल असेही नाही, असे सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलं.

 

 

Web Title :  Maharashtra Political News | maharashtra is disgusted with dirty
politics eknath khadse statement politics of violence in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा