Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि रोहित पवार यांच्यामध्ये रंगला कलगीतुरा

पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादीमध्ये (NCP) अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड पुकारल्यानंतर दोन गट एकमेकांविरोधात टिकाटिप्पणी करत आहेत. दोन्ही गटातील आमदार आरोप प्रत्यारोप करत असून आता अपात्रतेची याचिका देखील अजित पवार गट (Ajit Pawar Group) व शरद पवार गट (Sharad Pawar Group) यांनी दुसऱ्या गटातील आमदारांवर दाखल केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे सध्या आक्रमक पद्धतीने सत्ताधारी राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहेत. रोहित पवारांनी अजित पवार गटातील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत तर अजित पवार गटातील नेत्यांनी भाजपासोबत (BJP) जाण्यासाठी पहिली पसंती रोहित पवारांनी दिली असा घणाघात केला. आता पुन्हा एकदा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) आणि शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. (Maharashtra Political News)

काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांवर टीकास्त्र सोडत या भाजपासोबत गेलेल्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असे रोहित पवार म्हणाले होते. यावर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी कडक शब्दांमध्ये रोहित पवारांना उत्तर दिले आहे. तुम्ही कितीही जन्म घेतले तरी अजित पवार होऊ शकत नाही, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. सुनील तटकरे यांच्या बोलण्यावर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले आहे. कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मला अजित पवारांसारखं व्हायचं नाही असे सुनावले आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आता ‘तू तू मै मै’ चालू असलेली दिसून येत आहे. सुनील तटकरे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांसारखं व्हायचंही नाही. अजित पवार मोठे नेते आहेत. मात्र, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मी विचार जपण्यासाठी राजकारणात आलो आहे. शरद पवारांबरोबर राहून गेली 30-40 वर्षे लढणारी फळी अचानकपणे भाजपाबरोबर गेली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या रांगेत असणारे कार्यकर्ते अचानक पुढच्या रांगेत आलो आणि लढत असताना आम्ही भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्यामुळे काही लोकांना आम्ही नेते बनतोय असं वाटत असेल, तर ते चुकीचं आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी मत मांडले आहे. (Maharashtra Political News)

पुढे त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना टोला लगावला आणि म्हणाले, “त्यांना फक्त नेते माहिती आहेत, आम्हाला कार्यकर्ते आणि लोक माहिती आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू. आम्हाला नेता बनण्याची घाई नाही” अशा खोचक शब्दांमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली होती. “रोहित पवार अकाली प्रौढत्व आल्यासारखे वागतात,
जणू जगातील देशातले राजकारण एकट्यालाच कळतं असा त्यांचा अविर्भाव असतो.
अजित पवार हे दादा आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलात त्यात अजित पवारांचे योगदान मोठ आहे.
माध्यमांमध्ये दिसण्यासाठी अशी वक्तव्ये करतात” असा टोला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना लगावला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel | पुण्यातील तरुणाचा मृतदेह आढळला खंबाटकी बोगद्याजवळ, पाच दिवसांपासून होता बेपत्ता; प्रचंड खळबळ

Pune RTO- Helmet Compulsory | पुण्यात हेल्मेट सक्ती? कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक, पुण्यातील तब्बल 1744 कंपन्यांना नोटीसा

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ