
Maharashtra Political News | पुन्हा मोदीच येणार, म्हणत रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना राज्यात एकत्र येण्याची ऑफर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Political News | रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी देखील केली आहे. (Maharashtra Political News)
रामदास आठवले यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याची वल्गना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करता कामा नये. आंबेडकर यांनी आपल्या सोबत येण्याची भूमिका घ्यावी. तसे झाल्यास प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर वेगळा पर्याय देऊ शकते. मात्र, आपल्यासोबत येण्याचे धाडस ते का करीत नाहीत, हे मोठे कोडे आहे.
मोदींच्या विजयाची भविष्यवाणी करताना रामदास आठवले म्हणाले, विरोधकांची इंडिया अलायन्स असो अथवा अन्य प्रादेशिक पक्षांनी केलेले प्रयत्न, तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वातावरण पाहता भाजपप्रणित (BJP) रालोआ ही सर्वसामान्य जनतेची पसंती दिसत आहे. (Maharashtra Political News)
तृतीयपंथीयांच्या समस्यांबाबत बोलताना आठवले म्हणाले, तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे.
तृतीयपंथीसुद्धा माणूस आहेत. त्यांना सुद्धा अन्न वस्त्र निवाऱ्याचा अधिकार आहे.
तृतीयपंथींसाठी घरे राखीव ठेवावीत, या मागणीसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीही भेट घेणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा