Maharashtra Political News | ‘शिवसेनेचं पुढील नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे असेल, पण…’ रश्मी ठाकरेंबाबत ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष दिले आहे. त्यात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुढाकार घेत (Maharashtra Political News) असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे पुढील नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे असेल, पण उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सक्रीय राजकारणात येणार का? या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे.

 

ADV

संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे 15-20 वर्ष महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणात आहेत. त्यांना राजकारणात एक कालखंड लोटला. आमदार, मंत्री, पक्षाचे नेते म्हणून ते काम करत आहेत. रश्मी वहिनी महिलांच्या कामासंदर्भात सक्रीय असतात. (Maharashtra Political News) ज्या ठिकाणी महिलांवर अन्याय होतो त्या ठिकणच्या त्या महिला त्यांना येऊन भेटतात. त्यात रश्मीवहिनी सहभागी होतात. ठाण्यात आमच्या कर्यकर्त्या रोशनी शिंदेवर (Roshni Shinde) हल्ला झाला. तिथे त्या धावून गेल्या. रात्रभर तिथे पदाधिकाऱ्यांशी संपर्कात होत्या, मात्र त्या विधिमंडळ राजकारणात येईल असं मला वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

आदित्य ठाकरे यांच्या आजोबा बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) गुण आहेत.
संकटकाळात ज्याप्रकारे नेतृत्व उभे केले आहे. लोकं त्यांच्यावर फिदा आहेत.
आम्ही आता सिनियर झालोय आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करतील हे लोकांनी स्विकारलं आहे.
शिवसेना तरुणांची ताकद आहे. आदित्य ठाकरे ज्या प्रकारे काम करतायेत ते नुसते पक्षाचे काम करताय असं नाही
तर महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना आवडू लागले आहे,
असंही संजय राऊत यांनी सांगितले. ते एका मुलाखतीत बोलत होते.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | ‘The next leadership of Shiv Sena will be with Aditya Thackeray, but…’ Big statement of Thackeray group leader about Rashmi Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय