Maharashtra Politics | मोदी आणि फडणवीस म्हणजे ’बोलाचाच भात अन बोलाचीच कडी’; रोजगार मेळावा केवळ एक इव्हेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकार (Modi Government) देशातील 75 हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचा उपक्रम राबवत आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Maharashtra Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Spokesperson Atul Londhe) यांनी मोदी-फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. लोंढे यांनी म्हटले की, मोदी सरकार 75 हजार जागांची नियुक्ती पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा गाजावाजा (Maharashtra Politics) करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झाल्या असून नियुत्या प्रलंबित ठेवल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका (Maharashtra Politics) होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांची आठवण झाल्याने नरेंद्र मोदी व भाजपाने (BJP) रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे.

 

अतुल लोंढे म्हणाले, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मेगा इव्हेंट करण्यात कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन (Staff Selection), रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board), पोस्ट (Post) यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट (Maharashtra Politics) करता यावा म्हणून ही भरती थांबवली.

 

लोंढे म्हणाले, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, गुजरातच्या निवडणु काही लवकरच होतील.
या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहेत.
श्रम पोर्टलवर 22 कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त 7 लाख लोकांना नोकरी मिळाली आहे.

CMIE च्या मते 45 कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे. तर केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या 25 लाख जागा रिक्त आहेत.
उपलब्ध नोकर्‍या, नोकरी मागणार्‍यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता 75 हजार नोकर्‍या म्हणजे ‘उंट के मुँह में जिरा’ असेच म्हणावे लागले.

 

Web Title :- Maharashtra Politics | atul londhe slams narendra modi and devendra fadnavis over rojgar mela

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे