Maharashtra Politics | शिवसेनेकडून सारवासारव! जाहिरातीत केला बदल; आता जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेकडून (Shivsena) नुकतेच वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे (Shiv Sena Advertisement In News Papers) राज्याच्या (Maharashtra Politics) राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. अशातच आता शिवसेनेकडून आज (बुधवार) दिलेल्या जाहिरातीत बदल करण्यात आला आहे. कालच्या जाहिरातीवरून वातावरण तापल्याने शिवसेनेने जाहिरातीत दुरूस्ती केली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्याने जाहिराती देण्यात आल्या आहेत.

 

या नव्या जाहिरातीमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो झळकत आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली, अशी ग्वाही दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या साथीने विकासाचे पर्व महाराष्ट्रात आले आहे, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच जाहिरातीत वरच्या बाजूला मोदींसह बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे (Anand Dighe) आणि अमित शहा (Amit Shah) यांचे फोटो दिसत आहेत. (Maharashtra Politics)

 

 

सध्याच्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा फोटो त्यासोबतच भाजपचे (BJP) चिन्ह कमळ त्याच्या जोडीला शिवसेनेचे धनुष्यबाण प्रकाशित करण्यात आलेला आहे. या सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांचे फोटो ही प्रकाशित करण्यात आले आहेत. काल प्रकाशित झालेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपण ही जाहिरात दिलेलीच नव्हती, अशी भूमिका घेतली. कोल्हापूरमधील जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. एक प्रकारे आज केलेली चुकीची दुरुस्ती ही शिंदे यांनी भाजपच्या दबावासमोर माघार घेतल्याची चर्चा आहे.

 

कालच्या जाहिरातीत केवळ मोदी आणि शिंदे यांचेच फोटो होते. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली होती. आनंदाच्या क्षणी शिंदे हे बाळासाहेबांना विसरले, अशी टीका ठाकरे गटाने केली होती. तसेच, या जाहिरातींमुळे भाजपच्या गोटातही नाराजी आणि अस्वस्थता होती, अशी चर्चा आहे. या सगळ्यावर फुंकर म्हणून शिवसेनेने आज पुन्हा जाहिरातच बदलुन टाकली. आजच्या जाहिरातीत फडणवीसांचा फोटो आहे, मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोटो गायब आहे. तसेच, भाजप नेत्यांचेही फोटो आजच्या जाहिरातीत नाहीत, यावरुन आज पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चां रंगल्या आहेत.

 

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी शिवसेनेकडून (शिंदे गट) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती.
‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत
मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले
जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. अखेर शिवसेनेकडून जाहिरातीत बदल करण्यात आला आहे.

 

Web Title :  Maharashtra Politics | correction in yesterday advertisement by shivsena devendra fadnavis
balasaheb thackeray photos in today ad popularity percentage also added up cm eknath shinde bjp pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा