Maharashtra Politics | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, परंतु फडणवीसांवर असेल लक्ष; जाणून घ्या ’मास्टरस्ट्रोक’ मागील डाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) करण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक मानला जात असला तरी उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागल्याने ही रणनीतीही धोक्यात आली आहे. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशप्रमाणे शासन करण्यास अवघड राज्य आहे. पण 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी 2019 पर्यंत प्रभावीपणे राज्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या पराक्रमाचा मुकाबला करणार्‍या देशातील मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. (Maharashtra Politics)

 

महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांना पाहिजे तोपर्यंत सरकार टिकेल, असे मविआचे नेते म्हणायचे. शिवसेनेच्या आमदारांची नाडी पकडण्यात फडणवीस यशस्वी झाले आणि एमव्हीए खाली आणण्यातही ते यशस्वी झाले. पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडून मोठा संदेश दिला. (Maharashtra Politics)

 

फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय धक्कादायक
फडणवीस यांनी गोव्यात भाजपला सत्तेत आणण्यात यश मिळवले आणि 2019 च्या निवडणुकीनंतरही पक्षाला एकत्र ठेवले. भाजप नेते म्हणाले, आमच्या 106 आमदारांपैकी एकही आमदार सत्तेत आल्यानंतर एमव्हीएमध्ये आला नाही. आम्ही अत्यंत कठीण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुका जिंकण्यात यशस्वी झालो. यामध्ये फडणवीस यांची मोठी भूमिका होती.

शिंदे आणि फडणवीस यांचे संबंध बिघडण्याची शक्यता
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ही केवळ फडणवीसांना डाऊनग्रेड करण्याची गोष्ट नाही, तर ती ज्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे शिंदे आणि त्यांच्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

 

तज्ज्ञांच्या मते, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा तर्क समजण्यासारखा आहे कारण भाजपला 2024 च्या निवडणुकीसाठी मित्रपक्ष हवा आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची आहे आणि शेवटी शिंदे यांना संघटना म्हणून शिवसेनेवर नियंत्रण ठेवायचे आहे. फडणवीस नकार देऊनही त्यांना शिंदेचा डेप्युटी बनवणे इथे हे दर्शवते की शेवटी बॉस कोण आहे. दिल्लीने हाच संदेश दिला.

 

दोन सत्ताकेंद्रे – मुख्यमंत्री आणि प्रशासन
राजकीय तत्ज्ञ सांगतात की, भाजप हे जाहीरपणे सांगत आहे की त्यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री केले,
त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
अशा स्थितीत दोन सत्ताकेंद्रे असतील – एक मुख्यमंत्री आणि दुसरा ज्याची प्रशासनावर पकड असेल.
त्यामुळे सरकार चालवण्यात अडचणी येऊ शकतात. नितीश कुमार यांनी जितन मांझी यांना मुख्यमंत्री केले,
पण नंतर त्यांच्याशी वाद व्हायला वेळ लागला नाही, हे लक्षात ठेवावे लागेल.

 

Web Title :- Maharashtra Politics | deputy cm devendra fadnavis cm eknath shinde power maharashtra politics ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम