Maharashtra Politics | ‘उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला, राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये ‘, कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा (Governor Bhagat Singh Koshyari Resign) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी स्वीकारला. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी यावर प्रतिक्रिया देतना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे (BJP) एजंट म्हणून काम पाहिले. राज्यपालांचा राजीनामा मंजूर करुन महाराष्ट्रावर (Maharashtra Politics) उपकार केल्याचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटले. उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाल्याचे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती, असा घणाघात सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

 

पण केंद्र सरकारने ते केले नाही

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबाबत राज्यपालांनी जे वक्तव्य केले, त्यानंतर त्यांना तात्काळ हटविणे गरजेचे होते. पण केंद्र सरकारने (Central Government) ते केले नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. जेव्हा देशातील इतर राज्यपालांच्या नियमित बदल्या करायच्या होत्या, त्यात भगतसिंह कोश्यारी यांना बदलले, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

 

बैस आहे की बायस हे…

महाराष्ट्राला आता नवे राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस हे मला माहीत नाही. महाराष्ट्रात त्यांचे स्वागतच होईल आम्ही त्यांना सहकार्य करु. (Maharashtra Politics) मी रमेश बैस यांना ओळखतो ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी घटनेनुसार काम करावे. राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. लोकशाहीत विरोधकांचा आवाज देखील त्यांनी ऐकावा. तसेच ज्या राज्य सरकारची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. ते राज्य सरकार बेकायदेशीर आहे याचे भान त्यांनी ठेवावे, असे संजय राऊत म्हणाले.

 

उशीरा का होईना न्याय मिळाला – सुप्रिया सुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्दैवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले नाही. कोणत्याही देशात किंवा राज्यात महापुरुषांचा अपमान करणे हे अयोग्य आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी तेच पाप केलं. उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर दिली.

 

महाराष्ट्राचा मोठा विजय – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करुन म्हटले, महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना (Constitution), विधानसभा आणि लोकशाहीतले आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

 

अस्मितेची जरा जरी चाड असती तर… – सुषमा अंधारे

इडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जरा जरी चाड असती, तर असा राज्यपाल केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावा.
याचं विनंती पत्र त्यांनी तात्काळ लिहिलं असतं. जेव्हा ते महापुरुषांबद्दल वारंवार ठरवून खोडसाळपणे गरळ ओकत होते.
मात्र आता कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्याची जी ईडी सरकारने केलेली खेळी किंवा जो मनभावी पणा आहे
हे सरळसरळ निवडणुकीच्या (Election) तोंडावरची खेळी आहे.
लोकांच्या ज्या दुखावलेल्या अस्मिता आहेत त्याला मलमपट्टी लावण्याचा थातुरमातूर प्रकार
हा राजीनामा मंजूर करुन केला आहे,
असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.

 

 

 

Web Title :- Maharashtra Politics | know about ramesh bais new governor of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा