Maharashtra Politics | आधार कार्ड पाहून केवळ हिंदूनाच दांडिया स्थळी प्रवेश, विहिंपचे पत्र योग्यच, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढांकडून समर्थन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आधार कार्ड (Aadhar Card) पाहूनच केवळ हिंदूंना दांडिया (Dandiya) कार्यक्रम स्थळी प्रवेशाची परवानगी आयोजकांनी द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) केली आहे. या मागणीचे समर्थन भाजप (BJP) नेते तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

 

पत्रकारांशी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले की, गुजरातमध्ये तसे काही प्रकार घडले आहेत. दांडिया हा काही फक्त मनोरंजनाचा भाग नाही हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. ज्यांना पुजा करण्यात रस नाही त्यांनी यायच की नाही हा प्रश्न आहेच. मात्र याबाबत संबधित अधिकारी किंवा आयोजक निर्णय घेतील.

 

मुंबई महापालिका निवडणूकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभुमीवर भाजपाने मंत्री तुमच्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून मुंबईकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

 

याप्रसंगी लोढा म्हणाले, जे घरात बसून होते, ज्यांनी घरात बसूनच सरकार चालवले त्यांनी घरात बसून राहिल्यानच ही वेळ आली आहे.
आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्या ऑन स्पॅाट सोडवू. 25 वर्षांत जे काही पालिकेत सुरू आहे,
त्यानुसार जर कारवाई करायचे ठरवल तर अधिकारी शिल्लक राहणार नाहीत.

 

मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नवा फॅार्म्युला पालकमंत्री तुमच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | mumbai suburban guardian minister mangal prabhat lodha reaction over vhp demand and criticize shivsena over bmc election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा