Maharashtra Politics News | ‘बाबरी मशिद पडली तेव्हाही उद्धव ठाकरे ‘मातोश्री’मध्येच होते आणि आजही ‘मातोश्री’मध्येच आहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | बाबरी ढांचा (Babri Masjid) पाडला तेव्हा कोण होतं हे विचारायचं झालं तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठे होते? राम मंदिराच्या (Ram Mandir) संघर्षाच्या काळात त्यांची भूमिका काय होती? स्वत: नामानिराळे राहायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे. हे हवेचे बुडबुडे काढण्याचे प्रयोग, धंदे बंद करा. ज्यावेळी राम मंदिराचे आंदोलन, (Maharashtra Politics News) संघर्ष सुरु होत तेव्हाही तुम्ही मातोश्रीत होता आणि आजही मातोश्रीतून प्रश्न विचारत आहात अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

 

आशिष शेलार पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी व्यापक भूमिका त्यावेळच्या कारसेवकांसाठी घेतली हे खरे आहे. बाळासाहेबांनी राम जन्मभूमी अभियानात सकारात्मक भूमिका घेतली. या सगळ्याचा (Maharashtra Politics News) अभियानात नक्की उपयोग झाला. हिंदू साधुसंत, विविध संघटना यांनी चालवलेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मोठी होती. मात्र त्यांच्या जीवावर आज उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारावा, त्याआधी तुम्ही कुठे होता याचे उत्तर द्या असं शेलार यांनी सांगितले.

 

वायनाडमध्ये राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पुन्हा मी गांधी, सावरकर नव्हे असे पोस्टर्स लावलेत. मग तुम्ही गांधीधारी की सावरकर धारी याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. गांधीधारी असाल तर बाळासाहेबांचे विचार सोडून आज कुणाला चाटत बसला याचेही उत्तर द्यावे. चंद्रकांत दादा पाटलांच्या (Chandrakat Patil) वाक्याला या पद्धतीने जो अर्थ घेतला गेला ते वक्तव्य केलं नसतं तर बरं झालं असतं, असं आशिष शेलार म्हणाले.

 

सकल हिंदू समाज एकत्र आला पाहिजे अशी भूमिका त्याकाळी होती.
चंद्रकांत पाटील यांचे जे विधान केले ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वेगळी होती.
आजही हिंदू जन आक्रोश, लव्ह जिहादला विरोध करतात तेव्हा त्यावर उद्धव ठाकरे टीका करतात.
हिंदू एकत्र आला तर तुमच्या पोटात का दुखते? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics News | bjp president ashish shelar criticized uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी