Maharashtra Politics News | शिवसेना, राष्ट्रवादी आले तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत असले तरी राज्यात भाजपच नेहमी बॉस राहिला पाहिजे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. मुंबईतील दादरमध्ये भाजप विस्तारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केले. राज्यात आणि केंद्रात भाजपचे इतर पक्षांसोबत आघाडी करण्यावर भर दिला असला तरी या आघाडीची सूत्रे आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra Politics News)

आगामी निवडणुकीच्या पर्श्वभूमिवर राज्यातील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. भाजपने देखील बैठकांना सुरुवात केली आहे. भाजपकडून निवडणूक जिंकण्यसाठी ग्राम पातळीवर मायक्रो प्लानिंग सुरु आहे. दादर येथील पक्ष कार्यालयात भाजप लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. (Maharashtra Politics News)

भाजप इज ऑल्वेज बॉस

बैठकीला मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आले असले, तरी राज्यात भाजप ईज ऑल्वेज बॉस हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. युती मधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत त्यांचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. इथं मी उभा आहे ते पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल, असं फडणवीस यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकरांना करायचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीला उपस्थित असलेल्या विस्तारकांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, स्वत:साठी 10 तास आणि पक्षासाठी
14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करण्याचे आणि पक्षाची भूमिका
कार्य पोहचवण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Prakash Ambedkar | जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाले – ‘…तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय’