Maharashtra Politics News | ‘खोकेबहाद्दरांनी बोलू नये, उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदासाठी पैसे घेतले,’, शिंदे गटाच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

लखनौ : वृत्तसंस्था – Maharashtra Politics News | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे गटावर खोके घेतल्याचा आरोप करत गद्दार म्हणून हिणवले जात आहे. तर त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) विरोधकांच्या आरोपांना जशासतसे प्रत्युत्तर (Maharashtra Politics News) देत आहेत. मात्र आता दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरे खोकेबहाद्दर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असून मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे घेतले. तसेच पैसे दिले नाही तर त्यांना मंत्रिपदावरून काढले, असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

 

दीपक केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंकडे एक टीम आहे जी त्यांना खोटं कसं बोलायचं ते शिकवते. मुंबईचा (BMC) पैसा कुणी लुटला हे जनतेला माहिती आहे. ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे. मी कधीही त्यांच्याबद्दल बोलत नाही. मात्र किती मंत्र्यांकडून किती पैसे मागितले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रिपदावरुन (Maharashtra Politics News) कसे काढले हे देखील मला महिती आहे, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

 

सत्ता त्यांच्या डोक्यात गेली
खोकेबहाद्दरांनी असे बोलणे चुकीचे आहे. शेवटी नैतिकता असते. जेव्हा नैतिकता सोडली जाते त्यावेळी लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. तो आणखी तुटू देऊ नये. ठाकरेंच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली होती. सत्तेचा माज असल्याने ज्येष्ठ मंत्री, आमदारांनाही ते वेळ देत नव्हते. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठे आहेत हे कोणालाच माहित नसायचे. बंगल्यात बसून राज्य चालवायचं या कॅटेगिरीतील ते आहेत, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला.

 

संजय राऊत शरद पवारांचे प्राणिक
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर सध्या जो थयथयाट सुरु आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन नाही.
ते संजय राऊत (MP Sanjay Raut) रोज लोकांची मने दुखवण्याचे काम करतात.
ते ठाकरे कुटुंबाशी नाहीतर शरद पवारांशी (Sharad Pawar) प्रामाणिक आहेत.
राष्ट्रवादीसाठी काम करतात. शिवसेना फोडण्याचे काम राष्ट्रवादीने (NCP) राऊतांना दिले होते ते त्यांनी केलं आहे.
त्यामुळे त्यांचे समाधान झाले असेल तर त्यांनी आता शांत बसावं, असा टोला केसरकर यांनी राऊतांना लगावला.

 

Web Title :- Maharashtra Politics News | minister deepak kesarkar targeted uddhav thackeray aditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

CNG-PNG Rates Reduces | पुणेकरांना दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या किंमती 5.70 रुपयांनी स्वस्त

Maharashtra Politics News | ‘या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणात दुहीचं बीज पेरलं’, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कोणावर?