Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी’, भाजप नेत्याची खोचक टीका, म्हणाले-‘दोघींमध्ये…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) नावाच्या कार्यकर्तीला बेदम मारहण केली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics News) तापले आहे. ठाण्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी काल महाविकास आघाडीने ठाणे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner) कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना खुलं आव्हान दिलं होतं. यावर आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर घणाघात केला आहे.
राखी सावंतशी तुलना
मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट करत सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्यासोबत केली आहे. त्यांनी म्हटलं, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात. या दोघीच एकमेकांच्या स्पर्धक आहेत. तसेच दोघीपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा असते, असं टीकास्त्र मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) April 6, 2023
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब तुमच्या घरात 2006 पासून घरात घुसलेल्या बईचा आधी त्याचा बंदोबस्त करा, मग घरात घुसण्याची भाषा करा. तुम्ही स्वत:ला काडतूस समजत असाल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तोफ आहेत. तोफेसमोर काडतुसाचा निभाव लागत नाही. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना फिरू देणार नाही, या बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बावनकुळे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 48 तासात मातोश्रीवर यावे, असे थेट आव्हान अंधारे यांनी दिले.
Web Title :- Maharashtra Politics News | mohit kamboj vs sushma andhare mohit kamboj criticism sushma andhare
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update