Maharashtra Politics News | ‘थोड्या दिवसात स्वतःचे कपडे फाडून दगड मारत रस्त्यावर फिरतील’, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवर शिंदे गटाचा संताप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) फारच आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या मुद्यांवरुन ते शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधत असतात. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर टीका करत (Maharashtra Politics News) असतात. गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केलेल्या टिकेबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. राऊतांच्या या कृतीवरुन शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांच्या कृतीवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. नरेश म्हस्के म्हणाले, सत्ता गेल्यामुळे संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्या दिवसात स्वतःचे कपडे फाडून दगड मारीत रस्त्यावर फिरणार आहेत, अशी टीका म्हस्के यांनी केली. (Maharashtra Politics News)

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/nareshmhaske/status/1664545284616224769?s=20

मस्के पुढे म्हणाले, त्यांची अवस्था सत्ता गेल्यामुळे वाईट झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत ते फिरत आहेत आणि. यांच्यामुळे ह्यांचा जो रिस्पेक्ट आहे तो जनमानसामधून घालवणार आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देण्याचे काम संजय राऊत करत आहेत. काय परिस्थिती आलीय…कालपर्यंत शिव्या देत होते आज थुंकायला लागले आहेत. खूप वाईट परिस्थिती झालेली आहे त्यांची, अशा शब्दात मस्के यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.

नेमकं काय घडलं?

Advt.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे
(Kalyan Lok Sabha Constituency) खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर
टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील, असे श्रीकांत शिंदे म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला.
संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेव्हा पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले.
श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली.

Web Title :  Maharashtra Politics News | shivsena shinde group spokesperson naresh maske criticized sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Shivrajyabhishek Sohala | आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याने व्यक्त केला संताप

Raigad Shivrajyabhishek Sohala | ‘अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना…’, नितेश राणेंचे आव्हान

MP Udayanraje Bhosale | ‘तटकरे कुठल्या पक्षात आहेत?’ तटकरेंच्या ‘त्या’ प्रश्नावर उदयनराजेंची खोचक प्रतिक्रिया