Maharashtra Politics News | ‘तर एकनाथ शिंदे आमच्याकडे…’ उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरुन भाजपचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे (NCP) राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष मजबूत करण्यासाठी आजपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर (Maharashtra Politics News) येत आहेत. त्यावरुन भाजप (BJP) नेते सुधीर मुंनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 

उद्धव ठाकरे 9 आणि 10 या दोन दिवशी विदर्भातील (Vidarbha Tour) शिवसेनेचा (Shivsena) पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. कर्यकर्ते व नेते यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सध्याच्या राजकीय घडामोडींवर (Maharashtra Politics News) चर्चा करणार आहेत. आज पहिल्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी मंदिरात (Pohradevi Temple) जाणार आहे. हा भाग शिंदे गटातील (Shinde Group) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राठोड यांच्या बाजूने असलेला बंजारा समाज (Banjara Community) आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी यापूर्वीच सुरु केला आहे. या दौऱ्यात ते याबाबत आढावा घेऊन पुढील रणनिती आखण्याची शक्यता आहे. यानंतर ते वाशीम जिल्ह्यात जाणार आहेत.

 

सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर जात आहेत. काय करतील ते? कोरोनामध्ये (Corona) दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लागत आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.

 

शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लगतील. एकतर अगोदर अभ्यास करा मग बाकी जीवन सुखाचं.
नाहीतर अभ्यास नाही केला तर बीकी जीवन कष्टाचं, असं सूत्र असतं. हे आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना सांगितलं होतं.
ते त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं नसावं, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | then eknath shinde would not have come to us
sudhir mungantiwars comment on uddhav thackerays vidarbha visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा