Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा ‘गद्दार’ कोणी नाही, त्यांचा वाढदिवस ‘देशद्रोही दिन’ घोषीत करा’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | गेल्या वर्षी 20 जूनला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले आणि मविआतून बाहेर पडण्याचा हट्ट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केला. मात्र त्यांनी नकार दिल्याने एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली व भाजपसोबत (BJP) सत्तास्थापन केली. (Maharashtra Politics News) या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आजचा दिवस ‘विश्व देशद्रोही दिवस’ (गद्दार दिवस) जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावर भाजप आमदार निलेश राणेंनी (MLA Nilesh Rane) सडकून टीका करताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

 

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलै रोजी असतो. त्यांच्याएवढा मोठा गद्दार कोणीही नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी खोटेपणा केला, मराठी माणसांशी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाशी खोटेपणाने वागले. (Maharashtra Politics News) त्यामुळे 27 जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस’ घोषित करावा. मला आशा आहे की संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations Organization) माझ्या या मागणीचा नक्की विचार करतील, असं नितेश राणे म्हणाले.

 

उद्धव ठाकरे ‘अवली’ आणि त्यांचा मुलगा ‘कवली’

27 जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस हा देशद्रोही दिन म्हणून साजरा करा, असा मी युनायटेड नेशन्स ला ट्विट केले आहे. मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षामुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 19 सख्या भावासारखा उद्धव ठाकरेंना सांभाळलं. जी भाषा संजय राऊतांची (Sanjay Raut), तीच भाषा उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरे घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात सर्वात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा ‘कवली’, असा टोला नितेश राणेंनी लगावला.

 

 

तर दोन वर्धापनदिन झाले नसते

परवाच्या सभेत थयथयाट मागील करण कॅगचा अहवालनुसार होणारी कारवाई, ठाकरे आणि पाटणकरचे कपडे फाटले जाणार असा होता. पाटणकर, सरदेसाईंचे जेलमध्ये जायचे दिवस जवळ आलेत, पेंग्विन आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 25-30 वर्षे मुंबईला कसं लुटलं त्याचे प्रेझेन्टेशन दाखवा. 33 देशांत ठाकरेंचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने (Nandkishore Chaturvedi) लपवले आहेत.
सरकारी भाचा सरदेसाई मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठी फिरतोय.
बाळासाहेब कळले असते तर 2 वर्धापनदिन झाले नसते, अशी टीका त्यांनी केली.

 

राऊतांचा मालक जेलमध्ये जाणार

मुंबई पालिकेतील मस्ती बाहेर येणार संज्याचा मालक जेल मध्ये जाणार.
अडीज वर्षे महाविकास आघाडीच्या काळात धर्मांतर लव्ह जिहाद लँड जिहाद माध्यमातून हिंदू खतरे मे,
संजय राऊत तुझ्या मालकाने हिंदूंशी गद्दारी केली म्हणून आम्हाला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो.
मुंबईत बांगलादेशी रोहीनगे वाढले, बेहराम पाडा मालवणी भागात त्यांना वीज पाणी ठाकरेंच्या सत्ता काळात बीएमसीने पुरवले.
पक्षात राहून उद्धव ठाकरेंना कोण संपवत असेल तर तो संजय राऊत, असा आरोप त्यांनी केला

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | there is no bigger traitor than uddhav thackeray declare his
birthday 27 july as world traitor day says bjp nitesh rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations