Maharashtra Politics News | ‘राष्ट्रहितासाठी राष्ट्रवादी भाजपसोबत येत असेल तर…’, भाजप मंत्र्यांचं मोठ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच दरम्यान भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेले विधान महत्वाचे ठरत आहे. राष्ट्रवादी राष्ट्रवादासोबत येत असेल तर त्यात अडचण काय? आम्ही स्वत: राष्ट्रवादासोबत (Maharashtra Politics News) आहोत. जर ते राष्ट्रवादाच्या दिशेने येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं असं मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या हितासाठी राष्ट्रवादी चर्चा करत असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे. जर उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) न जाता ते देशहिताच्या मार्गावर चालणार असतील तर त्यात आमची (Maharashtra Politics News) काहीही हरकत नाही. मार्ग मोठा आहे. एक पाऊल त्यांच्याकडून पुढे यायला हवं. मग पाहूया. पुढे काय होते? महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारीत समीकरण बदलतील. काँग्रेस (Congress) स्वत: वेगळा होईल असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

दरम्यान, राज्यातील सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न शरद पवार यांना
विचारला असता, राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला मला बोलवलं होतं.
परंतु मला इथं काही काम असल्याने मी बैठकीला गेलो नाही.
पण मी उद्या दिल्लीला जाणार असून त्यांची भेट घेणार आहे.
आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असं शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणं टाळलं.
त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Web Title :- Maharashtra Politics News | there is no problem if ncp comes along for the sake of the country said bjp leader sudhir mungantiwar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulabrao Patil | ‘तेच ते बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा’, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

TDM Marathi Movie | जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है…! ‘टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज (Video)

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी