Maharashtra Politics News | राष्ट्रवादी ठाकरे गटाला धक्का देणार? विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीचा दावा; ‘या’ नेत्याचे नाव आले पुढे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | विधान परिषदेच्या (Legislative Council) आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील ठाकरे गटाचे (Thackeray Group) संख्याबळ कमी झाले आहे. याआधी विप्लव बाजोरिया (Biplav Bajoria) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांचे संख्याबळ सारखे झाले आहे. (Maharashtra Politics News) यानंतर आता राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

 

राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी सोमवारी याबाबत भूमिका स्पष्ट केली. तर आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एक ने कमी झाली, आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics News) त्यामुळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगली आहे.

 

नरहरी झिरवाळ यांनी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार आहोत. अमोल मिटकरी आणि नरहरी झिरवाळ यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 10 तर शिंदे गटाकडे एक आमदार होता.
तसेच राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 आमदार (Congress MLA) असून 5 अपक्ष आमदार आहेत.
त्यापैकी किशोर दराडे (Kishore Darade) यांनी ठाकरेंना तर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe)
यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. दराडे यांनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो.
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेत
ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 आमदार आहेत.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | vidhan parishad opposition leader ambadas danve ncp amol mitkari narhari zirwal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा