Maharashtra Politics | ‘शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले’ म्हणणाऱ्या शिवतारेंना उद्धव ठाकरेंच्या आतेबहीणीचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘पुरंदरच्या बापूला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मनात उठावाची बीज मीच पेरल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) माजी आमदार विजय शिवतारे (Former MLA Vijay Shivtare) यांनी केला आहे. या दाव्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आतेबहीण किर्ती फाटक (Kirti Phatak) यांनी शिवतारे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. येत्या निवडणुकीत पुरंदरच्या बापूला (Maharashtra Politics) गाडलेच पाहिजे, असे फाटक यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय म्हणाल्या किर्ती फाटक?
आतापर्यंत सर्व गद्दार…गद्दार असं म्हणत होते. मात्र, मी आज त्यांच्यातला सुपर गद्दार बघितला, जो स्वत:च्या गुन्ह्याची कबुली देत होता. आपण खूप महान काम केलं आहे, असा त्याचा थाट होता, अशी संतप्त प्रतिक्रिया किर्ती फाटक यांनी दिली. पूर्वी गारंबीचा बापू म्हणून कादंबरी होती. कोकणातल्या गारंबी गावातील बापूच्या प्रेमकथेवर ही कादंबरी होती. एक समाजिक भान जपणारी आणि सामाजिक, वैचारिक क्रांती करणारी ही कादंबरी होती. त्यामुळे बापू म्हटलं तर गारंबीचा बापू डोळ्यासमोर येतो. परंतु, आपल्याकडे सध्या एक निर्लज्ज असा पूरंदरचा बापू आहे. त्यांनी आज स्वत:च्या पापाची कबुली दिल्याचे फाटक म्हणाल्या. (Maharashtra Politics)

 

बापू म्हटलं की हा शब्द अनेक अर्थाने आपल्या समोर येतो. देशाचे बापू असतील किंवा गारंबीचा बापू. पण या बापूने घरच्याच महिलेला फसवलं आणि आणखी तीन बायका केल्या, असा हा बापू आज आपल्या गुन्ह्याची कबुली देत आहे. या गद्दाराला नेमकं काय म्हणायचं? हा बापू घातक आहे, त्याला येत्या निवडणुकीत गाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

काय म्हणाले विजय शिवतारे?
विजय शिवतारे म्हणाले की, ही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नंतर नाही झाली, आतलं खोल राजकारण सांगतो तुम्हाला 70 सीट तुमच्या आमच्या निव्वळ आम्हाला लढवून घालवल्या आणि त्या उद्धव ठाकरेंनीच घालवल्यात.
महाविकास आघाडी नंतर झाली, फसवतायत लोकांना अगोदरच झाली होती.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती,
असा खळबळजनक आरोप शिवतारे यांनी केला आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीबरोबर (NCP) समझोता झाल्याचे शिवतारे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी विरोधात उठाव करायचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात मीच पेरलं होतं,
असं विजय शिवतारे म्हणाले. साडेचार तास नंदनवनमध्ये बसून मी शिंदे यांना तयार केल्याचा दावा देखील त्यांनी केला.

 

Web Title :- Maharashtra Politics | uddhav thackeray sister kirti fatak slam vijay shivtare on eknath shinde revolt statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’