पार्किंगच्या वादातून एकाने दुसर्‍याच्या कानाचा ‘लचका’ काढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे. हा प्रकार पार्कींगच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे घडला आहे. या प्रकरणी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा.यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत गुंजाळ (रा.यमुनानगर, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोळे आणि आरोपी शेजारी राहतात. सोसायटीच्या पार्किंगमध्ये कौस्तुभ यांची दुचाकी होती. अभिजीत त्यांच्या दुचाकीजवळ बसुन काहीतरी करत होता. अभिजीत दुचाकीबरोबर काहीतरी खोडसाळपणा करत असल्याचे फिर्यादीच्या पत्नीने पाहिले. त्यांनी कौस्तुभ यांना घरात जाऊन ही बाब सांगितली. त्यानंतर अभिजीतला कौस्तुभ यांनी जाब विचारला.

जाब विचारल्याचा आरोपीला राग आल्याने त्याने कौस्तुभ यांच्या दुचाकीला लाथ मारुन ती खाली पाडली. कौस्तुभ यांच्या दुचाकीला लाथ का मारली असे विचारल्यानंतर, तुमच्या गाडीमुळे माझी चारचाकी पार्क करण्यास अडचण येते, असे सांगितले. त्यानंतर रागात कौस्तुभ आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यात त्यांना लोखंडी वस्तुने मारहाण करुन जखमी केले. विरोध करायला कौस्तुभ गेले असता आरोपीने त्यांच्या अंगावर धावुन जाऊन उजव्या कानाचा चावा घेतला आणि लचका तोडला. त्यानंतर कौस्तुभ यांनी पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like