Maharashtra Rain Update | मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-4 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह काही भागात रिमझिम पाऊस (Maharashtra Rain Update) सुरू आहे. मात्र, आज (बुधवार) पहाटेपासूनच अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार तासांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) आणि रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy To Very Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे.

सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा (Maharashtra Rain Update) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला होता. 27 जूनला सायंकाळी 5:30 पर्यंत कुलाबा केंद्रातील पावसाची नोंद 11.0 मिलिमीटर तर सांताक्रूझ केंद्रातील नोंद 31.8 मिलिमीटर होती. दरम्यान, 28 ते 30 जूनपर्यंत रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. पालघर जिल्ह्याला 28 ते 29 जूनपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच पुढील तीन-चार तासांत मुंबईतील पावसाचे (Rain) प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. आता चार-पाच दिवसांत मोसमी पाऊस (Seasonal Rain) सक्रिय राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

Web Title :  Maharashtra Rain Update | heavy rain predicted by meteorological department in next 3-4 hours in mumbai and some district of state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा