
Maharashtra Rain Update | मुंबई-पुण्यात पाऊस; कोकणाला पावसाचा ‘रेड अलर्ट’, काय सांगतो हवामानाचा अंदाज?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) पावसाची रिपरिप दिसून आली. पुण्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही भागात म्हणावा तसा पाऊस नाही. त्याठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता नाही. पण कोकण (Konkan) विभागामध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.
हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, 6 जुलै रोजी जारी केलेल्या पुढील चार आठवड्याच्या पूर्वानुमानानुसार 7 ते 13 जुलै, 14 जुलै ते 20 जुलै, 21 जुलै ते 27 जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस ( Maharashtra Rain Update) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. 7 ते 13 जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) तसेच विदर्भात (Vidarbha) काही ठिकाणी पाऊस येईल. मात्र 14 ते 20 जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल, असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे. 21 ते 27 जुलै या आठवड्यात मात्र संपूर्ण राज्यात पाऊस पडू शकतो. त्यानंतर 28 जुलै ते 3 ऑगस्ट या आठवड्यात पावसाचे प्रमाण पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात पाऊस पडू शकतो.
राज्यात सध्या 30 टक्के पावसाची तूट आहे. पालघर जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अतिरिक्त पावसाची (Additional Rain) नोंद झाली आहे. तर मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, लातूर, भंडारा, गोंदिया येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. दरम्यान, आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस थांबल्याने पेरण्या ठप्प झाल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार (Department of Agriculture Report) राज्यात 3 जुलैपर्यंत अवघ्या 14 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नाशिकचा विचार करता विभागात 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
Web Title : Maharashtra Rain Update | maharashtra weather forecast today rain update red alert to konkan and no rain in many parts of state
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात 12 ठिकाणी घरफोडी करणार्याला अटक, 5 लाखाचा ऐवज जप्त