Maharashtra Rains | राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, पुण्यात हलक्या सरी?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Rains | अरबी समुद्रासह (Arabian Sea) आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीयवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात पुढील 4 दिवस अनेक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण अंदमान समुद्रावर (South Andaman Sea) तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रातील तीव्रता 15 नोव्हेंबर नंतर वाढणार असून 18 नोव्हेंबरच्या सुमारास ते आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) किनाऱ्यालगत पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला आहे.
परिणामी राज्यात अनेक ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानात (temperature) सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे.

 

6 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

 

सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट (Thunderstorm and lightning) होण्याची शक्यता आहे.
गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा देण्यात आला आहे.
तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पुढील चार दिवसांत पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे.

 

या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस

 

बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात 14 आणि 15 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
16 आणि 17 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका पाऊस (Light rain) पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात रविवारी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यानंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rains)

 

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी (Pune Rains)

 

पुण्यात शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ असल्याने दिवसाचे कमाल तापमान 31.8 आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअसवर गेले आहे.
रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस (Pune Rains) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | rain alert maharashtra chance rain next four days rain also in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | फक्त एकदाच 2 लाख लावून सुरू करा ‘हा’ बिझनेस, 10 महिन्यानंतर होऊ लागेल 12 लाख रूपयांपर्यंत कमाई; जाणून घ्या कशी?

Earn Money | फक्त 10 हजार रुपयात सुरू करा आपला बिझनेस, मंथली होईल 30000 पेक्षा जास्त ‘कमाई’, जाणून घ्या कसे?

Pune Crime | …म्हणून संपुर्ण पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून जमावबंदी अन् कलम 144 लागू