गतिमंद मुलीवर परप्रांतीयाकडून बलात्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन 
एका परप्रांतीयाने गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीच नाव महंमद कुरेशी (वय २४ ) असून तो उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा आहे. घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचं हेरत त्यानं बलात्कार केला सदर घटना शिरुरअनंतपाळ तालुक्यातील शिराळा वांजरवाडा गावात घडली. मुलीनं नातेवाईकांना ही घटना सांगितल्यावर शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e29d38ee-cb8a-11e8-b3da-316ed98bd6a4′]
आरोपी महंमद कुरेशी  मिक्सर विकण्याचं काम करतो. दुपारी बाराच्या सुमारास तो मिक्सर विकण्यासाठी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. त्यावेळी त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. घरी कोणी नसल्याची संधी हेरून  गतिमंद मुलीवर अत्याचार केला. यानंतर हा नराधम तिथून पळून गेला. हा सर्व प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं.
[amazon_link asins=’B07D5ZD12G,B01N54ZM9W,B077N7DDL1,B0756W2GWM,B072X2BGM5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f524926e-cb8a-11e8-86f5-39820beff228′]
या घटनेची माहिती फोनवरुन तसेच व्हाटसअप वरून सर्वत्र देण्यात आली. त्यामुळे आरोपीला तात्काळ पकडण्यात  यश आलं. आरोपीला पीडित मुलीसमोर आणलं असता, मुलीने त्याला ओळखलं. त्यानंतर आरोपीला शिरुर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर लगेच माहिती दिल्याने, हा गुन्हा उघडकीस आला.पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.