Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’चा धोका कायम ! 24 तासात 7827 नवे पॉझिटिव्ह तर 173 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीनासामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढती रुग्णसंख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 7827 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3340 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 54 हजार 427 इतकी झाली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 173 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 4.04 टक्के आहे. 3340 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 325 रुग्ण बरे झाले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के झाले आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.3 टक्के इतके आहे. आतापर्यंत राज्या 13 लाख 17 हजार 895 नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले असून यामध्ये 2 लाख 54 हजार 427 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात 173 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाल असून आतापर्य़ंत 10289 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 47 हजार 801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like