Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मुंबईत झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra State Cabinet) वाईन विक्री (Wine Sales) बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुपरमार्केटमध्ये (Supermarket) आता वाईनची विक्री करता येणार आहे. अशा प्रकारचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra State Cabinet) घेण्यात आला. एक हजार स्क्वेअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.

 

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra State Cabinet) सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअर मध्ये (Walking Store) वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. यावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी याबाबतची माहिती दिली.

 

राज्यात नवी वाईन पॉलिसी (New Wine Policy) राबवण्याचा राज्य सरकारचा
(State Government) विचार आहे आणि त्यादृष्टीने राज्य सरकारनं आणखी
एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार एक हजार
कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकारनं पाऊलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

 

प्रति लिटर 10 रुपये आबकारी कर

सध्या राज्यामध्ये वाईनची विक्री दरवर्षी 70 लाख लिटरची आहे. सरकारच्या नव्या
धोरणामुळे हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु,
त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा आबकारी कर (Excise Tax)
जाहीर केला. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.

 

तर दुसरीकडे अनेक बेकरी पदार्थांमध्ये (Bakery Food) वाईनचा उपयोग केला जातो.
बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे (Alcohol) प्रमाण अत्यंत कमी असते.
त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी करण्यात येतो. यामुळे दैनंदिन किराणा दुकानात
(Grocery Store) होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.

Web Title :- Maharashtra State Cabinet | maharashtra govt decided to allow wine sale in 1000 sq feet super market

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी