Corona in Maharashtra : राज्यात ‘कोरोना’चा उद्रेक ! गेल्या 24 राज्यात 39,544 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3.5 लाखावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात 40 हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र, आज (बुधवार) पुन्हा 40 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 544 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 23 हजार 600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 24 लाख 027 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात राज्यामध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 3 लाख 56 हजार 243 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोरोना चाचणीच्या दरात बदल

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना चाचण्याचे सुधारीत दर जाहिर केले आहेत. त्यानुसार राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करणाऱ्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहेत. याशिवाय रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट 150 रुपयांत करण्यात येणार आहेत. या संदर्भात आरोग्य विभागने शासन निर्णय देखील जारी केला आहे.