मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना मुनगंटीवारांनी शिवसेनेला सांगितली ‘ती’ सशाची गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरु आहे. या दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा मांडला. त्यावरुन भाजप शिवसेनेत पुन्हा कलगीतुरा रंगला. परंतू त्यानंतर पुन्हा एकदा भाजपाने भित्र्या सशाची गोष्ट सांगितली आहे. शिवसेना, भाजपमध्ये सत्ता वाटपावरुन सुरु असलेला कलगीतुरा चर्चेतून संपेल, अशी अपेक्षा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी सुधीर मुनगंटीवर यांनी शिवसेनेला भित्र्या सशासह वाघाची गोष्ट ऐकवली.

सुधीर मुनगंटीवार यांनी जेव्हा राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केले त्यानंतर ‘सामना’तून भाजपवर तीर साधण्यात आला. त्यानंतर मी केवळ तांत्रिक बाब सांगितली. सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, यात चूक काय असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मित्र पक्ष वड्याचं तेल वांग्यावर काढत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

शिवसेनेला मुनगंटीवारांनी एका गोष्टीतून उपहासाचे डोस पाजले. बालभारतीतील एका धड्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, मला बालभारतीच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. भित्र्या सशाची. झाडाचे एक पान गळून नेमकं सशाच्या पाठीवर पडतं. तेव्हा सशाला आभाळ कोसळलं असं वाटतं आणि तो इकडे तिकडे पळत सुटतो. बालभारतीमधील हा धडा मला आजही आठवतो. बाकीच्यांना तो आठवतो का ते माहीत नाही असा टोल मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावला.

शिवसेनेला काँग्रेसबरोबर जाईल का या प्रश्नाला मात्र मुनगंटीवारांनी नाही असे उत्तर दिले. यावेळी काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी वाघाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, वाघ कितीही भुकेला असला तरी तो कधी गवत खात नाही त्यामुळे शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दूध साखर एकत्र येऊ शकते. पण दूध आणि लिंबू एकत्र येऊ शकत नाही असे सांगत त्यांनी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेऊन ही शक्यता नाकारली.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या