मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना ‘मोतीबिंदू’ झाला : अमित शहा

चंद्रपूर (राजुरा) : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा उल्लेख करून भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना मोतीबिंदू झाला आहे असं अमित शाह यांनी म्हटले आहे. राजुरा येथे झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर कलम 370 पुन्हा आणू असे बोलून दाखवावं असे आव्हान केले.

अमित शहा यांनी पुन्हा एकदा राज्यात आमचंच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजप कर्यकर्ते एक दिवस आधीच 24 ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात एकीकडे भाजप जिथे मोदींच्या नेतृत्वातील देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका अमित शहा यांनी केली.

कलम 370 हटवल्यानंतर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे सांगितले. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आमि टिळकांचा आहे. या ठिकाणीच स्वराज्याची लढाई सुरु झाली होती. हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि 370 चा काय संबंध अशी विचारणा करतात. पवारजी तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवं आहे हे देखील माहित नाही, असे शहा यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी