माहितीय का ? गांधींच्या हत्येचा ‘तो’ गुन्हेगार, ज्याला नथुराम गोडसेंसोबत झाली होती फाशी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महात्मा गांधींची हत्या म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो नथुराम गोडसेंचा चेहरा. 30 जानेवारी 1948 हा दिवस काही सामान्य नव्हता. या दिवशी महात्मा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधींसारख्या देशात नाही तर जगभरात लोकप्रिय असलेल्या एखाद्या व्यक्तीला संपवणं हे काही एकट्यादुकट्याचं काम नव्हतं. महात्मा गांधी हत्या प्रकरणात न्यायालयाने 9 जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

गांधी हत्येत फाशीची शिक्षा भोगलेल्या पहिल्या व्यक्तीचे नाव नथुराम गोडसे असल्याचे संपूर्ण जगाला माहिती आहे परंतु या प्रकरणातील दुसरी व्यक्ती कोण ज्या व्यक्तीला फाशी देण्यात आली त्याचे नाव अनेकांना कदाचितच माहित असेल. त्या व्यक्तीचे नाव आहे नारायण आपटे. नारायण आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि गोडसेंप्रमाणेच त्यांना देखील 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरुंगात फासावर चढवण्यात आले.

1939 साली आपटे हिंदू महासभेत सामील –
अशी माहिती मिळेत की नारायण आपटे यांचा जन्म 1911 साली एका अभिजात ब्राम्हण कुटूंबात झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सायन्सची पदवी घेतली आणि अनेक प्रकारची कामे केली. 1932 साली त्यांनी शिक्षक म्हणून अहमदनगरमध्ये काम केले. 1939 साली ते हिंदू महासभेत सहभागी झाले. 22 जुलै 1944 रोजी पाचगणी येथे त्यांनी महात्मा गांधींच्या विरोधात निदर्शन केली होती. 1948 साली त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचून हत्या केली.

म्हणून सावरकरांची कोर्टने केली मुक्तता –
10 फेब्रुवारी 1949 च्या दिवशी विशेष न्यायालयाने गांधींच्या हत्ये प्रकरणी शिक्षा सुनावल्या. या हत्याकांडातील 9 आरोपींपैकी एकाची न्यायालयाने मुक्तता केली. न्यायालयाने विनायक दामोदर सावकरांची पुराव्याआभावी मुक्तता केली होती. तर 8 आरोपींची गांधींची हत्या, कट, हिंसाचार आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील 2 आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना या प्रकरणी फाशी देण्यात आली. तर बाकी 6 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या आजीवन कारावास भोगणाऱ्या आरोपींपैकी एक नथुराम गोडसेंचा भाऊ गोपाळ गोडसे देखील सहभागी होता.

या रात्री झाली महात्मा गांधींची हत्या –
महात्मा गांधी जेव्हा 30 जानेवारी 1948 ला सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांना दिल्लीच्या बिरला भवनात सायंकाळी प्रार्थना करण्यासाठी जात होते तेव्हा नथुराम गोडसेंनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर महात्मा गांधींसोबत असलेल्या महिलेला बाजूला करत सेमी ऑटोमॅटिक पिस्तूलने एकामागोमाग 3 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.