Mahavikas Aghadi Government | शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादावरून लढाई तर दुसरीकडे काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) पक्षातील आमदारांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. काँग्रेस पक्षातील 27 आमदारांनी तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याकडे पत्र लिहित कामं होत नसल्याची तक्रार केली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकार पाच वर्षे सत्तेत राहिल, असा दावा ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 

राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून (NCP- Shivsena Credibility) लढाई सुरू असल्याचं दिसून आलं आहे.
त्याप्रमाणे ठाण्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई असताना, काँग्रेस (Congress) पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यामुळे सरकार पाच वर्षे टिकणार असा दावा केला तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काही अलबेल नसल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar),
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)
यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आघाडीत एकी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
त्यामुळे जिल्हा पातळीवरदेखील आघाडी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, खारेगाव (Kharegaon) येथील उड्डाणपूल, म्हाडाच्या (Mhada) रहिवाशांना व्याज, दंड माफीचा विषय यावरून अजुनही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे काँग्रसने शिवसेनेवर टीका करत स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेने ‘मिशन महापालिका निवडणूक’ सुरू केलं आहे.
मागे काही दिवसांमागे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला होता.
मात्र स्थानिक पातळीवर जरी संघर्ष पाहायला मिळत असला तरी वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये एकमत दिसत आहे.

 

Web Title :- Mahavikas Aghadi Government | shiv sena has once again claimed to have won 100 seats in the thane municipal corporation elections

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा