SBI च्या ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात झाला मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा भरावा लागू शकतो दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांकडून दंड आकारला जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 8 वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे. ही मर्यादा ओल्यांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते.

एसबीआय आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामुल्य पैसे काढण्याची परवानगी देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात रहात असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता SBI 5 ATM मधून विनामूल्य व्यवहार आणि इतर कोणत्याही बँकेतून 3 वेळा पैसे काढता येऊ शकतात. मेट्रो शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबाद सहभागी आहेत.

या शिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये 10 वेळा एटीएम मधून विना शुल्क पैसे काढू शकतात. त्यापैकी एसबीआय मधून पाच तर इतर बँकांच्या एटीएममधून पाचवेळ पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करु शकते.

पुरेसा बॅलन्स नसेल तर…
SBI च्या दुसऱ्या नियमांनुसार, एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत आणि तेवढे पैसे खात्यात नसतील तर तुमच्या प्रत्येक फेल ट्रान्झेक्शनला 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे आधी बॅलन्सची माहिती घेऊनच पैसे काढावे लागणार आहेत.

OTP सह काढू शकता ATM मधून रक्कम
जर खातेदाराला एटीएममधून दहा हजारापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यांच्या मोबाइलवर ओटीपी पाठविला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठवला जाणार नाही.